<

Shabari Gharkul Yojana शबरी घरकुल योजना २०२४

Shabari Gharkul Yojana शबरी घरकुल योजना २०२४

नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या पोस्टमध्ये शबरी घरकुल योजना यासंबंधी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर शबरी घरकुल योजनेसाठी असणारी पात्रता , योजनेसाठी महत्त्वाची लागणारे कागदपत्रे , शबरी घरकुल आवास योजनेसाठी शासनाकडून अनुदान किती मिळते ? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? हा अर्ज कुठे सादर करायचा ? हा अर्ज आपणास उपलब्ध कुठे होणार आहे ? यासंबंधी सर्व माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये सविस्तर पाहणार आहोत.

Shabari Gharkul Yojana शबरी घरकुल योजना ही राज्य शासनाची योजना असून , ही योजना वेगवेगळ्या प्रकारचे प्रवर्गासाठी राज्यभरातून राबविण्यात येते . शबरी घरकुल योजना नक्की काय आहे ? या योजनेसाठी पात्रता काय? शासनाने यासंबंधीचा जीआर जारी केलेला आहे. शासनाने ही योजना सन 2013 पासून राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू केली असून सर्वांना या शबरी घरकुल योजनेचा लाभही मिळाला आहे.

Shabari Gharkul Yojana शबरी घरकुल योजनेचा अर्ज हा ग्रामपंचायत स्तरावर भरला जात होता नंतर, हा अर्ज पंचायत समिती स्तरावर मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा लेवल या ठिकाणी जात होता , या योजनेचे मंजुरी आल्यानंतर यासाठी लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायत स्तरावर असणारा ग्रामसेवक याच्याकडे रोजगार हमीचे ओळखपत्र , नॅशनलाईज बँकेचे पासबुक व त्याला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असून , त्यासोबत आधार कार्ड असणेही गरजेचे आहे. या योजनेचा लाभ साधारणता भूमिहीन, मागासवर्गीय जनता यांना या योजनेचा लाभ मिळतो.

शबरी घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्याची पात्रता पुढीलप्रमाणे:

१. लाभार्थ्या महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.

२. अर्जदार मागासवर्गीय असेल तर जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

३. शबरी घरकुल योजनेसाठी तिच्याकडे स्वतःची जागा किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.

४. लाभार्थ्याकडे सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे पक्के घर नसावे.

५. विधवा स्त्रिया , परित्यक्ता , अतिदुर्गम भागातील स्त्रिया याला आवडताना प्राथमिकता देण्यात येईल.

शबरी घरकुल योजनेसाठी शासनाने काही उत्पन्न योजनेच्या मर्यादा ठेवलेले आहेत, त्या पुढीलप्रमाणे:shabari gharkul yojana 

१. शबरी योजनेसाठी ग्रामीण क्षेत्र एक लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न असावे.

२. तर शहरी भागासाठी दीड लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.

३. महानगरपालिका क्षेत्रासाठी किमान दोन लाख रुपये पर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने शबरी घरकुल योजनेसाठी खालील प्रकारे रक्कम देण्याचे ठरवले आहे.

१. ग्रामीण क्षेत्रासाठी एक लाख तीस हजार रुपये.

२. नक्षलग्रस्त आणि डोंगराळ क्षेत्रासाठी एक लाख 40 हजार रुपये.

३. शहरी भागासाठी दोन लाख रुपये. एवढे भरीव अनुदान ठेवले आहे.

शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :shabari gharkul yojana important document

१. स्वतः अर्जदाराची दोन पासपोर्ट साईज फोटो.

२. ग्रामपंचायत रहिवासी दाखला

३. जात प्रमाणपत्र

४. जमीन असेल तर सात-बारा आठ उतारा.

५. तहसीलदार उत्पन्न दाखला .

६. रेशन कार्ड

७. आधार कार्ड

८. बँकेचे पासबुक

साधारणता ही योजना अनुसूचित जमाती , इतर मागासवर्ग या प्रवर्गासाठी राज्यभरात राबवली जाते.

 

Leave a Comment