<

Pipeline Anudan Yojana 2024 पाईपलाईन अनुदान योजना २०२४

नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण आजच्या पोस्टमध्ये पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र शासन 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल द्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवले आहेत . त्यातील एक योजना म्हणजे पाईपलाईन अनुदान योजना , चला तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Pipeline Yojana 2024
Pipeline Yojana 2024

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या योजनांमधून महाराष्ट्रासाठी सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्या व त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांची कोरडवाहू जमीन ओलिताखाली यावी , कोरडवाहू शेती ही शेतकऱ्याने उलथ खाली आणावी . व त्या शेतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेती पिके घेऊन समृद्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाईपलाईन अनुदान योजना राबविण्यात येत आहे , त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी नोंदवावा अशी राज्य शासनाची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे , त्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते.

Pipeline Anudan Yojana 2024 . महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागवून mahadbt अनुदान वितरित करत असते. अर्ज प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन असून आणि शेतकऱ्याला कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये हेलपाटे मारण्याची गरज नाही , शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी जवळ असणारे CSC सेंटर, सायबर कॅफे, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपला अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचावी असेच सरकारचे ध्येय आहे. आज आपण या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे, अनुदान, पात्रता, ऑनलाइन सोडत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पाईपलाईन अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे : MAHADBT 

1. स्वतः शेतकऱ्याचे आधार कार्ड.

2. नॅशनल बँकेचे पासबुक .

3. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.

4. जमिनीचा सातबारा व आठ अ .

5. जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद आवश्यक.

6. सातबारावर ज्या ठिकाणी विहीर आहे, तेथे वीज कनेक्शन आवश्यक आहे.

पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया :

शेतकऱ्यांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे , हा अर्ज त्यांना महाडीबीटी पोर्टल वर जाऊन करायचा आहे. अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया होते , त्यानंतर लाभार्थ्याची लॉटरी पद्धतीने निवड ही करण्यात येते . झालेली निवड याचा मेसेज आपणास दिलेल्या मोबाईल नंबर वर मेसेज द्वारे येतो , तसेच आपल्या गावातील कृषी अधिकारी यांच्याकडूनही आपणास फोन येतो . शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर पुढील कागदपत्रे :

१. डिजिटल आठ अ व डिजिटल सातबारा.

२. बँकेचे पासबुक.

३.आधार कार्ड.

३.पीव्हीसी पाईपचे टेस्ट रिपोर्ट.

स्वतः शेतकरी इत्यादी कागदपत्रे सुरुवातीला अपलोड करायची आहेत.

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यास महाडीबीटी पोर्टलवर संमती पत्र प्राप्त होते , या संमती पत्र चा अर्थ असा की आपण एक महिन्याच्या आत मध्ये पीव्हीसी पाईप खरेदी करायची आहे , त्यानंतर त्या पाईपचे जीएसटी बिल , आधार कार्ड, ज्या बँकेचे अकाउंट दिलेले आहे त्या बँकेचे पासबुक , खरेदी करण्यासाठी दिलेले आरटीजीएस पावती अथवा बँकेचे स्टेटमेंट . इत्यादी कागदपत्रे पीव्हीसी पाईप अनुदान साठी लागतात. सुरुवातीला शेतकऱ्यास शंभर टक्के रक्कम भरून पीव्हीसी पाईप खरेदी करायची आहे, त्यानंतर एवढी प्रोसिजर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 टक्के अनुदान डीबीटी मार्फत अकाउंट वर येतात.

पीव्हीसी पाईप अनुदान किती मिळते व किती मीटर पर्यंत असते ?

शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप अनुदान हे 50 टक्के पर्यंत असते , अनुदानाची रक्कम ही पंधरा हजार रुपयांच्या आसपास आहे.

  1. शासनाकडून शेतकऱ्यांना एच डी पी 50 रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त 400 मीटर पर्यंतच्या पाईपलाईन अनुदान दिले जाते.
  2. शेतकऱ्यांनी पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला असेल तर किमान 35 रुपये प्रति मीटर प्रमाणे व जास्तीत जास्त 500 मीटर पाईप साठी अनुदान दिले जाते.
  3. शेतकरी या योजनेसाठी पात्र झाला असेल तर त्याच्या जमिनीचा आठ अ  सातबारा , पाईपलाईनचे कोटेशन बिल आवश्यक आहे.
  4. शेतकऱ्याचा अर्ज  शासकीय पोर्टलवर म्हणजेच महाडीबीटी MAHADBT FARMER या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे.

 

       योजनेसाठी या लिंक वर क्लिक करा.

 

 

Leave a Comment